Ad will apear here
Next
‘एसएसबी’ पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी २१ फेब्रुवारी ते दोन मार्च २०१९ या कालावधीत ‘एसएसबी’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी मुंबई शहरातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १८ फेब्रुवारीला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीला येण्याआधी पीसीटीसी ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेजवर किंवा पुणे सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाइटवरील रिक्रुटमेंट टॅबला क्लिक करून त्यामधील उपलब्ध चेक लिस्ट आणि महत्त्वाच्या तारखा यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतींमध्ये प्रिंट, तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाउनलोड करून त्यांचीही दोन प्रतींमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरून आणावेत.

केंद्रामध्ये ‘एसएसबी’ कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील कोणतीही एक पात्रता आवश्यक असून, त्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (यूपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. ‘एनसीसी’ सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने ‘एसएसबी’साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी ‘एसएसबी’ मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमसाठी ‘एसएसबी’ कॉल लेटर असावे किंवा ‘एसएसबी’साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी : प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक.
संपर्क क्रमांक : (०२५३) २४५१०३१, २४५१०३२
पुणे सैनिक कल्याण विभागाची वेबसाइट : www.mahasainik.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZSXBX
Similar Posts
भारतीय सशस्त्र सैन्यदलात भरतीसाठी नाशिक येथे पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिकमधील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी २५ जुलै ते तीन ऑगस्ट २०१७ या कालावधीत पूर्वप्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाशिक रोड रेल्वेस्थानकाची पाहणी नाशिक : सध्या देशात असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या दर्जात्मक आणि गुणात्मक सेवा याची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) डॉ. आर. बद्रीनारायण यांनी चार मार्च २०१९ रोजी नाशिक रोड रेल्वेस्थानकाला भेट दिली. स्थानकातील प्रवासी सुरक्षा व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा नाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,
‘स्वच्छ’ माळेगावचा गौरव मुंबई : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नाशिक जिल्हा पातळीवर माळेगाव (ता. सिन्नर) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नुकत्याच झालेल्या सोहळ्यात माळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल आव्हाड, समिती अध्यक्ष माजी सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी व नाशिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language